'त्या' व्हिडिओ वरुन मनसेचा भाजपवर पलटवार ; म्हणाले, "आम्हाला दादागिरी..."

"टोल फोडणं म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका व शिकवा", असं म्हणत भाजपने अमित ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता
'त्या' व्हिडिओ वरुन मनसेचा भाजपवर पलटवार ; म्हणाले, "आम्हाला दादागिरी..."
ANI

मनसे नेते अमित ठाकरे यांचं वाहन अडवल्यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. याप्रकरणाला आता अनेक फाटे फुटताना दिसत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्यावरुन भाजपनं अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपने आपल्या ट्वटिर हँडलवरुन अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "टोल फोडणं म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका व शिकवा", असं म्हणत भाजपने अमित ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसंच "हे भाजप सरकार आहे. दादागिरी चालू देणार नाही", असा इशारा देखील अमित ठाकरे आणि मनसैनिकांना देण्यात आला आहे. यानंतर मनसेने देखील भाजपवर पलटवार केला आहे.

भाजपने ट्विट केल्यानंतर मनसेकडून त्यावर आता प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. "'टोल फोडल्याबद्दल आम्हाला बोलणारे... आयुष्यभर ज्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला बांधण्याबद्दल शिकवणार? त्यांनी दुसऱ्याचा पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वत:चा पक्ष बांधावा, एक टोल फुटला तर एवढी थोबाड उघडणारे, मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या तेव्हा भाडपचं थोबाडं बंद का होतं? आता फक्त टोलनाक्याच्या कंत्राटदारांची दलाली करायची आहे का तुम्हाला? हेच भाजप शिवसेना सरकार २०१४ ला सत्तेत येणार होते. तेव्हा यांनीच जाहीर केलं होतं ना महाराष्ट्रतले टोल बंद करणार? मग आता विसरले का?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

याबाब बोलताना, "कुणाची काय चालेल आणि काय नाही हे आम्हाला भाजपकडून शिकायची गरज नाही. भाजपने आम्हाला दादागिरी शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते", असं देखील संदीप देशपांडे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in