मोदींनी केलं २०२४ च्या निवडणुकीचं भाकीत ; म्हणाले, "सर्व विक्रम मोडत..."

मी विरोधकांना एकच सांगेल की, तुम्ही तयारी करुन येत नाही. थोडी मेहनत घ्या. २०१८ मध्ये मी सांगितलं होतं की...
मोदींनी केलं २०२४ च्या निवडणुकीचं भाकीत ; म्हणाले, "सर्व विक्रम मोडत..."

काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खास शैलील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच "देव खुप दयावान आहरे. त्याच्या आशिवार्दानेच विरोधकांनी अविश्वास आणण्याची बुद्दी सुचली." असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत भाकीत केलं.

अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी म्हणाले की, जनतेने आमच्यावर वारंवार विश्वास दर्शवला आहे. यामुळे देशातील जनतेचे मी आभार मानतो.देव खुल दयाळू असतो. तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इच्छा पूर्ण करत असतो. देवाने विरोधकांना अविश्वास मांडण्याची बुद्धी दिली त्याबाबत मी देवाचे आभार मानतो. हा प्रस्ताव आमची परिक्षा नाही तर विरोधकांची परिक्षा आहे. अशा प्रकारचा अविश्वास आमच्यासाठी शुभ असतो. असं मोदी म्हणाले.

यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबात बोलताना मोदी म्हणाले की, आज मी बघत आहे की, एनडीए आणि भाजपा २०२४ मध्ये निवडणुकीत सर्व विक्रम मोडत भव्य विजयासह जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा सत्तेत येत आहे. मी विरोधकांना एकच सांगेल की, तुम्ही तयारी करुन येत नाही. थोडी मेहनत घ्या. २०१८ मध्ये मी सांगितलं होतं की, तयारी करुन या. देश तुम्हाला बघत आहे. हे विसरु नका. असं मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in