निकालापूर्वीच मोदींचा बैठकांचा धडाका, नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याच्या सूचना

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बैठकांचा धडाका लावला.
निकालापूर्वीच मोदींचा बैठकांचा धडाका, नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याच्या सूचना
@ANI

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बैठकांचा धडाका लावला. देशातील उष्णतेची लाट, रुग्णालयांमध्ये आग लागण्याचे घडलेले प्रकार, रेमल चक्रीवादळानंतरची स्थिती आणि निवडणूक निकालानंतरच्या १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांची रूपरेषा तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

देशातील उष्णतेच्या लाटेचा आढावा घेताना मोदी यांनी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा आणि वीजसुरक्षेची नियमित तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. उष्णतेच्या लाटेबद्दलचा आढावा घेताना मोदी यांनी, आगीचे प्रकार रोखण्यासाठी नियमितपणे काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जंगलात लागणाऱ्या आगी आणि जैवविविधतेचा वापर याचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे मोदी यांना सांगण्यात आले. देशाच्या काही संमिश्र पानावर

logo
marathi.freepressjournal.in