विजयी भाषणाच्या पहिल्याचं वाक्यात मोदींचा 'फ्री हीट'; म्हणाले, "हा आवाज..."

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत
विजयी भाषणाच्या पहिल्याचं वाक्यात मोदींचा 'फ्री हीट'; म्हणाले, "हा आवाज..."
@BJP4India

नुकताच देशातील चार राज्यातील विधनसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेला तेलंगणात सत्ता काबीज करता आली आहे.

चार पैकी तीन राज्यात झालेल्या दमदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाषणाला सुरुवात करताच पहिल्या वाक्यात षटकार ठोकला आहे.

पंतप्रधान मोदी भाषणासाठी व्यासपीठावर येताच उपस्थितांमधून 'भारत माता की जय' आणि 'मोदी मोदी' अशा घोषणा सुरु होत्या. त्याच क्षणी मोदी म्हणाले की, 'भारत माता की जय' हा आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासाची भावना जिंकली आहे. विकसीत भारताच्या आवाहनाचा आज विजय झाला आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा आज विजय झाला आहे. वंचितांच्या विजयाचा आज वियज झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारताच्या विकासासाठी राज्याचा विकास या विचाराचा विजय झाला आहे. आज इमानदारी, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय झाला आहे. मी सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपवर भरपूर प्रेम केलं. तेलंगणात देखील भाजपचा पाठिंबा वाढत आहे.

हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की जेव्हा आपल्या कुटुंबियांकडून इतकं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो. त्यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढते हे मी व्यक्तीगतरित्या अनुभवतो आहे. आजही माझ्या मनात हाच भाव आहे. मी माझ्या माता- भगिनी, युवा साथींसमोर, शेतकरी भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे, असं मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in