खासदार अमोल कोल्हे अजित पवार गटासोबत? सुनील तटकरेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
खासदार अमोल कोल्हे अजित पवार गटासोबत? सुनील तटकरेंच्या दाव्याने चर्चांना उधाण
Published on

खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार ,सुप्रिया सुळे यांनी केली होती. आता अजित पवार गटाकडून याला उत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी त्याला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधातील कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सुनिल तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्महद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे. असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. महत्वाचं म्हणजे तटकरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचं नाव यात घेतलेलं नाही. त्यांनी सांगितलं की खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळे ते आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही २ जुलै रोजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. नागालँड, झारखंड येथील आमदारांनी देखील याला समर्थन दिलं आहे. आम्ही राज्यभर दौरा सुरु करत आहोत. पहिला दौरा विदर्भातून असेल. त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल. राज्यातील जनता अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आहे. संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती असा सातत्याने उल्लेख करत असतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अलीकडच्या काळातील निर्णयाया आधार घेऊन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in