नाना पटोलेंची अजित पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले, "सरड्यासारखं..."

भाजपकडून समृद्धी महामार्गावर निर्दोषांची हत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप देखील नाना पटोले यांनी केला
नाना पटोलेंची अजित पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले, "सरड्यासारखं..."

नाशिकमधील इगतपुरी येथे एका गरोदर असलेल्या आदिवासी महिलेचा उपराचार अभावी मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद विधानभवनात उमटले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. यावेळी त्यांनी भाजपला सत्तेचा माज आला आहे, पण आता लोक हा माज उतरवतील अशी टीका त्यांनी केली. यावेळी भाजपकडून मुठभर लोकांना सोई सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप देखील नाना यांनी केला.

यावेळी नाना पटोले यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. सत्तेत गेलेले हे लोक वास्तव लपवत आहेत. सरड्यासारखं होऊ नका, अशी आमची त्यांना सुचना आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली. सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे. मी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना सरडा म्हणण्याचं कारणच हे आहे की सत्तेत गेल्यावर ते आता वेगळंच वागत आहेत, असं देखील नाना म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्यावरुन भाजपावर टीका केली. यावर प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांच्या मुद्याचं समर्थन केलं आहे. भाजपवाले टोलमुक्त महाराष्ट्र ओरडत होते. त्याचं काय झालं ? असं म्हणत भाजपकडून समृद्धी महामार्गावर निर्दोषांची हत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप देखील नाना पटोले यांनी केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकारला घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार असं म्हटलं. घोषणा करुन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका, असं आवाहन देखील त्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in