Narendra Modi: चार राज्यांच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; जनतेचे आभार मानत म्हणाले...

यावेळी मोदींनी तेलंगणाच्या जनतेचे देखील आभार मानले आहे.
Narendra Modi: चार राज्यांच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; जनतेचे आभार मानत म्हणाले...

चार राज्यांच्या विधानसभेच्या निकालांवर मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता-जनार्दनाला नमन! असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशस, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे. त्यांचा विश्वास भाजपावर आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या सर्व राज्यातील कुटुंबातील सदस्यांचे, विशेषत: माता, भगिनी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचं भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशिर्वाद दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.

आपल्या ट्विटमध्ये मोदी पुढे म्हणतात की, या निमित्ताने पक्षासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण सादर केलं आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरमं ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कौतुक करता येणार नाही. विकसित भारताचे ध्येय घेऊन आपण पुढे जात आहोत. आपल्याला थांबायचं नाही आणि खचून जायचं नाही. आपल्याला भारताता विजयी करायचं आहे. आपण आज एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचललं आहे.

यावेळी मोदींनी तेलंगणाच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत. ते म्हणाले, भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या प्रिय भगिनी आणि तेलंगणातील भांधवांचे आभार मानतो. गेल्या काही वर्षात हा पाठिंबा वाढत आहे आणि भविष्यात हाच ट्रेंड कायम राहणार आहे. तेलंगणाशी आमचं नातं अतूट असून आम्ही लोकांसाठी काम करत राहू. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचं मी कौतूक करतो.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या चार राज्याच्या निकालात भाजपला घवघवी यश मिळवलं आहे. सत्ताधारी भाजपने मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखत २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ६६ जागांवर विजय मिळवला आहे. छत्तीसगडममध्ये भाजपने ५४ जागांवर विजय मिळवत राज्य काँग्रेसकडून हिसकावून घेतलं आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला मात्र फक्त ३६ जागा राखता आल्या आहेत. राजस्थानमध्ये देखील भाजपने काँग्रेसला धोबीपछाड देत १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळत जादुई आकडा गाठला आहे. तिकडे तेलंगणता काँग्रेसने बीआरएसचा पराभव करत सत्ता खेचून आणली आहे. मात्र भाजपने देखील आपल्या जागा वाढवत ८ जागांवर विजय मिळवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in