राष्ट्रवादीच्या आमदाराची संभाजी भिडेंवर शेलक्या भाषेत टीका ; म्हणाले, "'मनु' आजोबा..."

संभाजी भिडेंनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, शिर्डीचे साईबाब यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीच्या आमदाराची संभाजी भिडेंवर शेलक्या भाषेत टीका ; म्हणाले, "'मनु' आजोबा..."

काल चांद्रयान- ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केलं. यासोबतच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला. अनेकांनी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहिलं. या एवढ्या मोठ्या पराक्रमाचं श्रेय हे अनेकांनी शास्त्रज्ञांना दिलं. तर काही नेत्यांमध्ये यासाठी चढाओढ दिसून आली. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंवर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्याने अनेकांनी राष्ट्रध्वज आणि चांद्रयानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले. या तिरंगा झेंड्यावरुन अमोल मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी ही कोपरखळी मारली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, "'मनु' आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला... लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरुजीचं योगदान बी हाय म्हणत्यात...आता कसं. " असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य हे चर्चेचा विषय ठरतात. त्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, शिर्डीचे साईबाब यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. याशिवाय भिडेंनी तिरंगा झेंडा आणि स्वातंत्र्य दिनाला देखील विरोध करत आक्षेप नोंदवला होता. यावरुन आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंना टोला लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in