NCP : विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय नेमकं कुणाचं?अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वाद पेटला

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कुणाचे यावरून चर्चा रंगताना बघायला मिळत होती
NCP : विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय नेमकं कुणाचं?अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वाद पेटला
Published on

आज पासून राज्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापल्याचे आज पाहायला मिळत आहे. विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे.

काल या ठिकाणी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. त्यानंतर रात्रीत जितेंद्र आव्हाड यांच्या देखील नावाची पाटी याठिकाणी लावण्यात आली. त्यामुळे कार्यालय नक्की कुणाला मिळाला याबद्दल चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता, हे कार्यालय अजित पवार गटाला मिळालं का? याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कुणाचे यावरून चर्चा रंगताना बघायला मिळत होती. कारण अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी कार्यालयाला लावण्यात आली होती. याबद्दल 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने वृत्त दाखवताच शरद पवार गटाचे प्रतोद असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील पाटी रात्रीतून लावण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in