नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट , नारायण राणे म्हणाले की...

शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र या भेटीविषयी अनेक राजकीय तर्कवितर्क
नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट , नारायण राणे म्हणाले की...
Published on

राज्याच्या विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र या भेटीविषयी अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीबद्दल थेट नीलम गोऱ्हे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ही राजकीय भेट नव्हती असं स्पष्ट केलं आहे. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही तिथे उपस्थित होते हा निव्वळ योगायोग होता. 

माझ्यामुळे नीलम गोऱ्हे अजून शिवसेनेत नाहीतर..

मुख्यमंत्री आणि नीलम गोऱ्हे यांच्या भेटीबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारले असता, ते म्हणाले की, 'निलमताई शिवसेनेत नाराज आहेत. मीच त्यांना शिवसेनेत थांबवलं नाहीतर त्या आतापर्यंत शिवसेनेत राहिल्या नसत्या..' याबाबत अधिक माहितीसाठी गोऱ्हे यांना याचे स्पष्टीकरण विचारले असता त्या म्हणाल्या की, २००४ पासून आपला आणि नारायण राणेंचा साधी औपचारिक भेट देखील झाली नाही. त्यांना असे वक्तव्य करून काय साध्य करायचे आहे हे त्यांचं माहीत...  त्यामुळे मनाने अंदाज बांधून ते काहीतरी बोलले असतील. त्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं,” असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in