जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही; आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा

शिवसेना-भाजप यांच्यात लोकसभेच्या जागावाटपावरुन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही; आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा
Published on

राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी या दोन्ही निवडणुका सोबत लढवणार असल्याचं तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप मात्र ग्रांपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका सोबत लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशात शिवसेना-भाजप यांच्यात लोकसभेच्या जागावाटपावरुन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे काही मंत्री त्यांच्या पारंपारिक जागांवर अडून बसले आहेत. शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरुन भाजपला इशारा दिला आहे.
शिवसेना ज्या जागांवर निवडून आली आहे. त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. आम्हाला कोणीही गृहीत धरु नये. असा थेट इशारा सावंत यांनी भाजपला दिला आहे. आम्हाला कोणीही सहज घेतले तर ते आम्ही मान्य करणार नसल्याचं देखील ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी सुरु आहे. आगामी काळातील निवडणुकांसाठी बैठका सुरु आहेत. अशात शिवसेना नेते आपल्या जागांवर ठाम असून त्यांनी भाजपला इशारा दिल्याने भाजप-सेनेत फुट पडणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

धाराशिव लोकसभेची जागा 2024 ला शिवसेनाच लढवणार असल्याचं मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. सध्या या जागेवरुन भाजप सेनेत वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. यावर मंत्री सावंत यांनी थेट भाजपलाच इशारा दिला आहे. तसंच शिवसेना ज्या जागांवर निवडुन आली आहे. तिथे शिवसेनेचाच उमेदवार असणार असं ठणकावून सांगितलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी आम्ही जिंकलेल्या 18 जागांपैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. आमचा गट वेगळा आहे आणि आमचं अस्तित्वही वेगळं असल्याचं म्हटलं आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल, असं वक्यव्य केलं होतं. यामुळे हा वाद उफाळून आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in