नुपूर शर्मा वादाचे महाराष्ट्रात पडसाद, राज्याच्या गृहमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात...
आंदोलक
आंदोलक ANI
Published on

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज देशात मोठ्या संख्येने निषेध व्यक्त होत आहे. देशासोबत महाराष्ट्रामध्ये देखील याचे  पडसाद पाहायला मिळाले. विशेषतः औरंगाबाद, सोलापूर, परभणी, अहमदनगर आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरताना पाह्यला मिळाले.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेने शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले. तसेच राज्यातील विविध भागांतील आंदोलनानंतर परिस्थितीचा आढावा घेतला आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in