मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पत्र घेऊन राजभवनावर ; अजित पवार म्हणाले...

खातेवाटपच्या खडोमोडींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे गेले आहेत
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पत्र घेऊन राजभवनावर ; अजित पवार म्हणाले...

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमादारांच्या मोठ्या गटाच्या पाठिंब्यावर आपल्या आठ नेत्यांसह शिंदे सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीला बरेच दिवस उलटले तरी देखीत खाते वाटप झालेलं नाही. मात्र. आता खातेवाटपच्या खडोमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे गेले आहेत. याच पार्श्वभूमिवर अजित पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.

आज (१४ जुलै) रोजी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रीमंडळात काम केलं आहे. खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिदें घेतील. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

याविषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, मला जी माहिती मिळाली त्यानुसार राज्यपालांकडे यादी गेली आहे. त्यात कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली आहेत ते जाहीर होईल. त्यानुसार मंत्री त्या त्या खात्यांची जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील. असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. आता कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in