मायावतींच्या स्वबळाच्या नाऱ्यावर विरोधकांची प्रतिक्रिया ; म्हणाले...

भाजपचा बालेकिल्ला बनलेला यूपीत विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना मायावतींच्या या निर्णयाने एकप्रकारे सुरुंग लागला आहे.
मायावतींच्या स्वबळाच्या नाऱ्यावर विरोधकांची प्रतिक्रिया ; म्हणाले...

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी इंडिया आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र अशात, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आगामी निवढणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचा बालेकिल्ला बनलेला उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना मायावतींच्या या निर्णयाने एकप्रकारे सुरुंग लागला आहे. मायावतींनी आगामी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयावर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया' मधून प्रतिक्रिया आल्या आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मायावती यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही मयावतींना इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलेलं नाही. निवडणुका जवळ येत असून आम्ही पुढील तयारीला लागलो आहोत. यावेळी लालूंना इंडिया आघाडीचा संयोजक कोण होईल, मल्लिकार्जून खर्गे की नितीश कुमार असं विचारलं, यावेळी त्यांनी याबाबतचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाईल, असं उत्तर दिलं.

दरम्यान, मायावतींच्या स्वबळाच्या नाऱ्यावर इतर पक्षांकडून देखील प्रतिक्रिया आल्या आहेत. काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले की, मायावतींना इंडिया आघाडीत येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं विनंतीपत्र पाठवण्यात आलेलं नाही. त्या आता दलिताची मुलगी राहिल्या नसून दौलतीच्या कन्या झाल्या आहेत. तर समाजवादी पक्षाच्या जुही सिंह म्हणाल्या, मयावती या भाजपासोबत आहेत. त्यामुळे त्या इंडिया आघाडीचा बाग बनलेल्या नाहीत. त्या बाहेर राहून भाजपाला फायदा पोहोचवत आहेत. जनतेला सगळं कळतंय, असा प्रतिक्रिया विरोधकांच्या आघाडीमधून येताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in