पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन झाले पराभूत

इंडोनेशिया मास्टर्स सुपर-५०० टूर्नामेंटमध्ये भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात
पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन झाले पराभूत

दोन वेळा ऑलिम्पिकचे पदक विजेता राहिलेली पी. व्ही. सिंधू आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन हे शुक्रवारी पराभूत झाल्याने इंडोनेशिया मास्टर्स सुपर-५०० टूर्नामेंटमध्ये भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

लक्ष्य सेनला चायनीज तैपेईच्या चोउ तिएन चेन याने नमविले, तर सिंधूला थायलंडच्या रेचानोक इंतानोनने पराभूत केले. इंतानोनने अत्यंत आक्रमक खेळाच्या जोरावर २१-१२, २१-१० असा विजय मिळविला. इंतानोनने आक्रमतेबरोरबरच बचावही भक्कपणे केला. तिच्या फटकाऱ्यांपुढे सिंधू पुरती निष्प्रभ ठरली.

त्याआधी, लक्ष्य सेनने दुसऱ्या गेममध्ये मुसंडी मारूनही चायनीज तैपेईचा तिसरा मानांकित चोउने निर्णायक गेममध्ये शानदार खेळ करत बाजी मारली. एक तासांहून अधिक चाललेल्या या सामन्यात २१-१६, १२-२१, २१-१४ असा विजय मिळविला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in