पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान ; म्हणाल्या, "गेल्या दहा वर्षांपासून..."

त्यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान ; म्हणाल्या, "गेल्या दहा वर्षांपासून..."

भाजपनेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या राजकारणातील ब्रेकनंतर पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने त्या सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने त्यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

पंकजा यांनी माध्यमांशी बोलताना शिवशक्ती परिक्रमा यांत्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. तसंच अनेक ठिकाणी मोठमोठे सत्कार सोहळे पार पडत आहेत. मी सत्कार सोहळ्यांना नको सांगितलं. कारण आपण बोलू असं मी सांगत आहे, असं पंकजा म्हणाल्या.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्याबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून कार्यकर्त्यांना वाटतं की मी मुख्यमंत्री व्हाव. त्यात काही नवीन नाही.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमा करत असून या यात्रेला मिळालेल्या प्रतिसाद पाहून त्यांनी विधानसभेआधी आपण पुन्हा एक यात्रा काढणार असल्याचं म्हटलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in