
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी कोणत्याही परिस्थितीत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रविवारी एमआयएमशी सूत जुळवण्यास नकार दिला आहे. ‘‘कोणाशी आघाडी करावी, हे त्यांचं त्यांनी ठरवावं. आमच्या पक्षात राज्यातील नेत्यांना कोणाशी आघाडी करण्याचे अधिकार नाहीत. ते केंद्रीय स्तरावर घेतले जातात, असेही पवार यांनी स्पष्ट केले.