देशातील जनताच माझी उत्तराधिकारी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

इंडिया आघाडीत घराणेशाही असून ती जातीयवादीही आहे, आघाडीतील सर्व घटक पक्ष त्याचे तंतोतंत प्रदर्शन करतात, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चढविला.
देशातील जनताच माझी उत्तराधिकारी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
(संग्रहित छायाचित्र)
Published on

महाराजगंज/मोतिहारी : इंडिया आघाडीत घराणेशाही असून ती जातीयवादीही आहे, आघाडीतील सर्व घटक पक्ष त्याचे तंतोतंत प्रदर्शन करतात, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चढविला. माझा कुणीही उत्तराधिकारी नाही, देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे, असेही मोदी म्हणाले.

बिहारच्या महाराजगंज आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. लोकसभेचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील, तेव्हा विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का बसणार आहे, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. राजद-काँग्रेसने बिहारला खंडणीखोर म्हणून प्रसिद्ध केले. पंजाब, तेलंगण आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये या पक्षांच्या नेत्यांनी बिहारमधील जनतेबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली तरी काँग्रेसचे शाही कुटुंब त्याबद्दल अवाक्षरही बोलले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

तुमचे मत पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी

तुमचे मत केवळ स्थानिक खासदाराला निवडून देण्यासाठी नाही तर तुमच्या पंतप्रधानांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून ते व्होट जिहादमध्ये जे सहभागी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी काँग्रेसला घटनेत बदल करावयाचा आहे, असा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in