पंतप्रधान मोदी रोमच्या 'निरो'पेक्षाही असंवेदनशील ; मणिपूर हिंसाचारावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

राहुल गांधींची लोकप्रियता पाहून भाजप सरकार घाबरलं असल्याचंही नाना पटोले म्हणाले
पंतप्रधान मोदी रोमच्या 'निरो'पेक्षाही असंवेदनशील ; मणिपूर हिंसाचारावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

मणिपूर येथे सुरु असलेल्या हिंसाचारावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मागील ५२ दिवसांपासून मणिपूर येथे हिंसाचार सुरु आहे. यावर पंतप्रधानांनी 'म' देखील काढला नाही, हे देशासह मणिपूरी जनतेचे दुर्देव असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. केंद्र सरकार स्व:ता काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी मणिपूरच्या जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखलं जाणं हे मोदींच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसंच 'रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता' या प्रवृत्तीला लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान पंतप्रधान भारताला लाभाला असल्याचं काँग्रेसने म्हटलं.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मणिपूरमध्ये रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचं नाना पटोले यावेळी म्हणाले. तसंच मणिपूरची जनता केंद्राच्या मदतीची आस लावून आहे. पण पंतप्रधान मोदी मात्र मणिपूर जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी आहे, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

राहुल गांधी हे मणिपूरच्या जनेतेचे दु:ख जाणून घेण्यसाठी गेले होते. सुरुवातीला त्यांना रस्ते मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली. राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी मणिपूरची जनता हजारोच्या संख्येने उभी होती. राहुल गांधींची लोकप्रियता पाहून भाजप सरकार घाबरलं असून त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.


राहुल गांधी यांना परत पाठवल्यानंतर येथील स्थानिक लोकांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल हे बंधुभाव, प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूरला पोहचले होते. पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावं असं वाटत नसावं म्हणूनच राहुल गांधीना रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला.

राहुल गांधींना इम्फाळ विमानतळासमोरील बिष्णुपूर येकपोस्टवर थांबवण्यात आलं. इम्फाळपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधी यांचा ताफा थांबवण्यात आला. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राहुला यांना पुढे जाण्यापासून रोखल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in