PM Modi: पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला; म्हणाले,"आता तरी सुधरा, नाहीतर..."

आज संसदेच्या हिवाळी अदिवेशनाला सुरुवात होत आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
PM Modi: पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला; म्हणाले,"आता तरी सुधरा, नाहीतर..."

आज संसदेच्या हिवाळी अदिवेशनाला सुरुवात होत आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत त्यांना सल्ला दिला आहे. पराभवाचा राग संसदेत काढू नका, असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवण्याचा प्रयत्न केला आहे. मतदान प्रक्रिया पार पडलेल्या पाच पैकी चार विधानसभा राज्यांचे निकाल काल जाहीर झाले. यात भाजपने तीन राज्यांत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने फक्त एका राज्याची सत्ता काबीज केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

विरोधी पक्षांचा तीन राज्यात झालेल्या दारुण पराभवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्यांना निवडणुकीत परवाभ झाला आहे. त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नका. लोकशाहीत पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचं हित विसरु नका. हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतसमोर आणा, असं आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे.

तीन राज्यांत झालेल्या विजयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही लोक याला सरकार समर्थक सुशासन किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात दिसून येत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचं मंदिर हे महत्वाचं व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो, त्यांनी तयार राहुन संसदेत मांडलेल्या विधयेकांवर सखोल चर्चा करावी.

ते पुढे म्हणाले की, शिवीगाळ, निराशा आणि नकारात्मकता घमंडिया आघाडीसाठी हेडलाईन्स बनू शकतात, पण जनतेच्या मनात स्थान देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशारा देणाता म्हणाले की, सुधरा, नाहीतर जनता तुम्हांलाच साफ करेल. हा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीसाठी मोठा धडा आहे. काही घराणेशाहीचे लोक एकत्र एका मंचावर आल्याने फक्त चांगला फोटो येऊ शकतो, पण देशाचा विश्वास जिंकू शकत नाही. देशाच्या जनतेचं मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवा करणँ गरजेचं आहे.

त्यांनी म्हटलं की, देशात हळू हळू थंडी वाढत असली तरी राजकीय वातावरण मात्र तापलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साहात दाखवणारे आणि देशाचे भविष्य निश्चित करणारे आहेत. चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत येण्याचं आवाहन करतो. तसंच बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या, असंही मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in