काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण - मोदी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण आहे. या निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लगावला.
काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण - मोदी

फुलबनी (ओदिशा) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण आहे. या निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लगावला. फुलबनी येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत मोदी म्हणाले की, ओदिशात ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होणार आहे. ओडिया भाषा व संस्कृती जाणणाऱ्यांना भाजप मुख्यमंत्री पदी बसवेल. नवीन पटनायक अनेक वर्षे ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत. मी नवीन पटनायकांना आव्हान देतो की, त्यांनी कागद हातात न घेता सर्व जिल्हयांची नावे सांगावीत. जर मुख्यमंत्री तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगू शकत नसतील, तर ते तुमचे दु:ख कसे दूर करणार असा प्रश्न मोदी यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in