राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता ; शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानाने खळबळ

आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता ; शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानाने खळबळ

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्यमत घेतरला. यावेळी त्यांनी आपल्या आठ सहकाऱ्यांसह मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली. अजित पवार यांचं बंड ताज असताना महाराष्ट्रात आणखी एक बंड होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाच्या आमदाराने याबाबत सुचक विधान केलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात आणखी एक गट सत्तेत येणार असून काँग्रेसचे १६ ते १७ आमदार संपर्कात आहेत, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता, काँग्रेस पक्ष फुटणार हे निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून त्यात शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना मंत्रीपदं दिली जातील हे देखील तेवढचं सत्य असल्याचं ते म्हमाले.

याविषयी बोलताना शिरसाट म्हणाले की, काँग्रेस कधी फुटणार आणि ते कधी सत्तेत येणार यासाठी थोडी वाट पहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळात काँग्रेस देखील आमच्याबरोबर दिसेल, असं दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस पक्ष खरच फुटणार का? राज्यात पुन्हा राजकीय भुकंप होणार का? आणि काँग्रेस फुटणार असेल तर काँग्रेसमधील नेमका कोणता गट फुटणार? या बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in