2024 साली देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे पुण्यातून निवडणुक लढवण्याबाबत चर्चांना उधान आलं आहे. पुण्याचे माजी खासदार संजय काकडे(Sanjay kakde) यांनी पंतप्रधान मोदींना याबाबतचं पत्र लिहिलं आहे. या पत्रात काकडे यांनी मोदींना पुण्यातून लोकसभा निवडणुक लढवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी मात्र मोदींविरोधात दंड थोपटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुण्यातून निवडणुक लढवणार असतील तर त्यांचा पराभव करु, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
संजय काकडे यांचं पंतप्रधानांना पत्र
"जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशातून निवरडणूक लढवली, तेव्हा तेथील त्या राज्यात ९० ते १०० टक्के यश भाजपला मिळालं. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही भाजपला ९- ते १०० टक्के यश मिळेल. पंतप्रधानांच्या कामांचं पुणेकरांनी कौतूक केलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी पुण्यातून निवडणूक लढवावी ", अशी विनंती माजी खासदार संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली आहे.
काकडे यांच्या पत्रावर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं समजत आहे. आम्ही पंतप्रधानांचं पुण्यात स्वागत करतो. गेल्या ९ वर्षात देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरु आहे. देशातील जनता या राजकारणाला त्रस्त झाली आहे.देशात महागाई असून शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न आहेत."
ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोणी लढायची हे ठरले. पक्षाने मला उमेदवारी दिली तर विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पंतप्रधान निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करु. पण, निवडणूक मात्र आम्हीचं जिंकू, असं धंगेकर म्हणाले.