पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, १४ मे रोजी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला.
narendra modi/ X
पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित होती.
narendra modi/ X
गंगा सप्तमीचा शुभ मुहूर्त साधत मोदींनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा मातेची पूजा करत दिवसाची सुरुवात केली.
ANI
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा केली.
narendra modi/ X
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोदी दाखल झाले. त्यावेळी आजूबाजूला मोठ्यासंख्येने समर्थक उपस्थित होते.
narendra modi/ X
काशीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी सोमवारी, १३ मे रोजी रोड शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही बरीच गर्दी झाली होती.BJP / X
मोदींनी सोमवारी, १३ मे रोजी सायंकाळी बाबा विश्वनात जाऊन मंदिर पूजा केली.
narendra modi/ X