राहुल गांधी यांच्यावर संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप ; स्मृती इराणी भडकल्या

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. यात २२ महिला खासदारांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांच्यावर संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप ; स्मृती इराणी भडकल्या
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करतांना भाजपचे चांगलेचं वाभाडे काढले. मात्र आता ते एका नव्या अडचणीत सापडले आहेत. राहुल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी हा आरोप केला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वक्त केली जात आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. यात २२ महिला खासदारांचा समावेश आहे.

संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवास वादळी ठरला. राहुल गांधी यांनी यावेळी चर्चेदरम्यान मोदी सरकारला धारेवर धरलं. मात्र, ते पुन्हा एकदा आरोपांच्या भोवऱ्यात सापडले. सभागृहात जात असताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी यांच्यावर काय कारवाई केली पाहीजे. यावर सध्या विचार सुरु असून सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इरामी यांनी राहुल गांधी याच्यावर आरोप करत त्यांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "ज्यांना माझ्या आधी बोलण्याची संधी मिळाली त्याच्याबाबत माझा आक्षेप आहे. त्यांनी जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केलं आहे. संसदेच्या महिला सदस्य असलेल्या संसदेला फ्लाइंग किस देऊ शकणारा हा केवळ दुष्ट पुरुष आहे. यापूर्वी देशाच्या संसदेत असं अशोभनीय वर्तन कधीही पाहीलं नाही. "

logo
marathi.freepressjournal.in