अखेर राहुल गांधी यांना पासपोर्ट मिळाला; आजचं होणार अमेरिकेला रवाना

कोर्टाने राहुल यांना तीन वर्षासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.
अखेर राहुल गांधी यांना पासपोर्ट मिळाला; आजचं होणार अमेरिकेला रवाना
@ANI

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी खटल्यात सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजनैतिक प्रवासाचे दस्ताऐवज परत करावे लागले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी सामान्य पासपोर्ट परत मिळवण्यासाठी दिल्लीच्या कोर्टात दहा वर्षासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने राहुल यांना तीन वर्षासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. त्यांना एनओसी मिळाल्यानंतर रविवारी(28 मे) रोजी गांधी यांना पासपोर्ट मिळाला आहे. त्यानंतर ते आज (29 मे) अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

पासपोर्ट कार्यलयाकडून राहुल यांना रविवारी पासपोर्ट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना रविवारी पासपोर्ट देण्यात आला. दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांना दहा ऐवजी 3 वर्षासाठी सामान्य पासपोर्ट जारी करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश गेल्या शुक्रवारी दिलं होतं.

राहुल गांधी यांनी 10 वर्षासाठी हे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांचा त्यांच्या मागणीला विरोध होता. त्यांनी गांधी यांना फक्त एका वर्षासाठी परवानी देण्यात यावी, असं सांगितलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे दहा वर्षासाठी एनओसी मागण्यासाठी कोणतेही ठोस आणि वैध कारण नसल्याचा युक्तीवाद सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. 24 मे रोजी याप्रकरणी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु कोर्टात यावर सुनावणी दरम्यान स्वामी यांनी राहूल यांच्या परदेश दौऱ्यामुळे तपासणीत अडथळा निर्माण होईल, असं सांगितलं होतं. यानंतर कोर्टाने निर्णय घेण्यासाठी एक दिवसाचा अवधी मागत 26 मे रोजी राहुल यांना तीन वर्षासाठी एनओसी देण्याची परवानगी दिली. त्यांमुळे त्यांना तीन वर्षांनी पुन्हा पासपोर्ट मिळण्यासाठी गरजेचं असणारं ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

दरम्यान, राहूल गांधी हे आज (29 मे) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. तेथील इतर शहरांमध्ये देखील त्यांचे कार्यक्रम पार पडणार आहेत. राहुल गांधी हे 4 जून रोजी तेथील भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in