"ते भारताचे पंतप्रधान, हे त्यांना शोभत नाही", राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला दिलेल्या उत्तरावरुन राहुल यांनी मोदींना धारेवर धरलं.
"ते भारताचे पंतप्रधान, हे त्यांना शोभत नाही", राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधाला. विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला दिलेल्या उत्तरावरुन राहुल यांनी मोदींना धारेवर धरलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. जवळपास १९ वर्ष झाले मी राजकारणात आहे. वादळ, त्सुनामीवेळी मीअनेक राज्यांमध्ये गेलो. मात्र, मणिपूरमध्ये जे पाहीलं ते पूर्वी कधीही पाहीलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. मोदी मात्र त्यांच्या भाषणादरम्यान दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत २ तास १३ मिनिटं भाषण केलं. यापैकी शेवटची २ मिनिटं ते मणिपूरबद्दल बोलले. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. मुलांना मारलं जात आहे. पण मोदी मात्र काल भाषण करताना हसत बोलत होते, चेष्टा करत होते, ते भारताचे पंतप्रधान आहेत, हे त्यांना शोभणारं नाही. विषय काँग्रेस नव्हता, राहुल गांधी नव्हता तर मणिपूर होता. असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींव निशाणा साधला.

logo
marathi.freepressjournal.in