राहुल गांधी यांचा अंबाला ते चंदीगड ट्रकने प्रवास

ट्रक चालकांचे जीवन, त्यांच्या समोरील अडचणी, त्यांना भेडसावणारे प्रश्न हे जाणून घेण्यासाठी राहुल यांनी ट्रक मधून प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांचा अंबाला ते चंदीगड ट्रकने प्रवास

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. अनेकदा त्यांचे मुद्दे हे वादात देखील सापडले आहेत. तसेच ते आपल्या साधेपणासाठी तसेच सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी देखील ओळखले जातात. सध्या राहुल गांधी हे एका नव्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे दिल्लीहून शिमल्याला गेले होते. त्यादरम्यान त्यांनी अंबाला ते चंदीगड हा प्रवास ट्रक'ने केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्रक प्रवासाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर या प्रवासादार्म्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी राहुल यांच्या ट्रक प्रवासाचे कौतुक केले आहे. ट्रक चालकांचे जीवन, त्यांच्या समोरील अडचणी, त्यांना भेडसावणारे प्रश्न हे जाणून घेण्यासाठी राहुल यांनी ट्रक मधून प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी याबाबचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी ट्रक चालकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे श्रीनेत यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या अंबाला ते चंदीड प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, राहुल यांचा असे करण्याचा हा पहिला प्रसंग नाही. नुकताच कर्नाटक विधानसभेचा निकाल लागून त्यात काँग्रेसने भरघोस यश संपादन केले. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळत सरकार स्थापन केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससोबत संवाद साधाला होता. त्यावेळी देखील त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील प्रचारादम्यानच सरकारी बसमधून प्रवास करत प्रवाशांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देखील चर्चा केली होती.

काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी मच्छीमारांशी संवाद साधत त्यांच्यासोबत बोटीने प्रवास केला होता. यावेळी त्यांनी मच्छीमारांसोबत समुद्रात पोहण्याचा देखील आनंद लुटला होता. त्यावेळी राहुल गांधी यांचा सुमुद्रात पोहतानाचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच एकदा राहुल यांचा विद्यार्थ्यांना फिटनेसचे धडे देतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे देताना दिसून आले होते.

राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' दरम्यान पायी चालत सर्वाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी तरुण, महिला, शोषीत यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या या यात्रेला देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा त्यांनी भारत जोडो यात्रेत केलेल्या वक्तव्यांवरुन वाद देखील निर्माण झाले होते. मात्र राहुल हे आपल्या प्रत्येक वक्तव्यावर ठाम होते. राहुल गांधी यांचे जनेतेत मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे सर्व स्तरावर कौतूक होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in