Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा दिलासा; 13 वर्षापूर्वीचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

राज्य निवडणूक आयोगाने १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राज यांना नोटीस बजावली होती
Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा दिलासा; 13 वर्षापूर्वीचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या(KDMC) २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या विरोधात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यामुळे राज यांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालका हद्दीत राहण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या मुदतीनंतरही राज हे मतदारसंघात होते. असं करुन त्यांनी निवडणूकआचारसंहितेचा भंग केला, असा आरोप त्यांच्यावर होता. राज्य निवडणूक आयोगाने राज यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा आणि दाखलपत्र दाखल केले होते. गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी राज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने राज यांच्या याचिकेवर शुक्रवारी निर्णय देताना त्यांची मागमी मान्य केली. तसंच त्यांच्या विरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द केले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राज यांना नोटीस बजावली होती. कायद्यांतर्गत राज यांना नोटीस बजावली होती. कायद्यानुसार राजकीय नेत्यांना निडणुकीच्या ४८ तास आधी निवडणूक क्षेत्रात राहण्याची परवानगी नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in