
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण त्यांच्यासोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने त्यांच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे हे भाजपसोबत स्टेजवर दिसणार का? याबाबत चर्चांना उधान आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रेतील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी याबाबत विधान केलं. ते म्हमाले की, मला भाजपची ऑफर आली असून त्यांनी युतीचा प्रस्ताव दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवार देखील आहेत. भाजप अजित पवार यांचं काय करणार आहे. माहिती नाही. युतीचं नेमंक गणित काय असेल याबाबतही काही स्पष्टता नाही. त्यामुळे नी अजून अंतिम निर्णयापर्तंय पोहचलेलो नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.