रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले, "बाळासाहेबांच्या पोटी..."

उद्धव ठाकरे यांनी वडिलांशी बेईमानी करण्याचं तसंच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल्याचही कदम म्हणाले
रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले, "बाळासाहेबांच्या पोटी..."

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीचे दर्शन घेऊन आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. तर आज अमरावती येथे कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर तोफ डागली. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. बाळासाहेबांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आला या शब्दात त्यांनी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मी सांगेन की, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. १९६६ साली हिंदुत्वासाठी शिवसेनेची स्थापना झाली. जेव्हा मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी वडिलांशी बेईमाई करण्याचं तसंच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं असून त्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार रामदास कदम, एकनाथ शिंदे यांना आहे. आमदार, खासदार गेले पण उद्धव ठाकरे यांचा पीळ गेलेला नाही. अडीच वर्ष स्वत:ला घरात कोंडून घेतलं ते आता विदर्भात फिरत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे असं देखील रामदास कदम म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in