Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाविषयी रोहित पवारांचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "निवडणूक आयोग...."

काही दिसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हाला (अजित पवार गटाला) मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता.
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाविषयी रोहित पवारांचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "निवडणूक आयोग...."

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) (शरद पवार ) कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार(MLA Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हाविषयी मोठं वक्तव्य केलं. आहे. शरद पवार(Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे कायदेशीररित्या पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडेच राहील असं आम्हाला वाटते. मात्र, निवडणूक आयोग(Election Commission) आमच्या बाजूनं निर्यण देईल, याबाबत आम्ही साशंक आहोत, असं रोहित पवार म्हणाले. यावेळी निवडणूक आयोग भाजपच्या(BJP) हातातील बाहूले आहे, असं देखील त्यांनी म्हटलं.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांना सोबत घेत भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी देखील शिंदे गटाप्रमाणे राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावर आपला दावा सांगितला. यामुळे राष्ट्रवादी कुणाची? हा वाद निवडणूक आयोगाच्या दारी गेला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील बाहूले आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल आमच्या बाजूने लागेल का नाही याबद्दल आम्ही साशंक आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

काही दिसांपूर्वी शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्याबरोबर गेल्यावर त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. आता रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. निवडणूक आयोग आमच्या विरोधात निर्णय देण्याची शक्यता आहे. पण भविष्यात न्यायालयीन लढाई आम्ही निश्चित जिंकू, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in