Ramdas Athavale : ठाकरे- आंबेडकर युतीवरून आठवले म्हणाले, एकत्र आले तर...

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.
Ramdas Athavale : ठाकरे- आंबेडकर युतीवरून आठवले म्हणाले, एकत्र आले तर...

शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एकत्र येणार असलायच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, 'भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळे ठाकरे - आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडत नाही.' असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी लगावला आहे. तसेच, त्यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघडीत बिघाडी होईल, असेदेखील ते म्हणाले.

सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले तरी माझ्या पाठीशी भीमशक्ती असल्याने जास्त फरक पडणार नाही. राज्यातले शिंदे सरकार हे भक्कम असून ते आपला कालावधी पूर्ण तर करणारच, शिवाय २०२४च्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने सत्तेवर येईल. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे ३५० तर एनडीएचे ४५० खासदार निवडून येतील. राहूल गांधी हे पंतप्रधान होणार नाहीत. सध्या सुरु असलेली त्यांची 'भारत जोडो' यात्रा ही 'भारत तोडो' यात्रा आहे. आधी काँग्रेसने 'काँग्रेस जोडो' यात्रा काढायला हवी." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in