"पवारांनाही मोडू शकतो, मोडणारा या महाराष्ट्राने पाहीला ; राष्ट्रवादीतील बंडावर सदाभाऊंनी केलं फडणवीसांच कौतूक

सदाभाऊ यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना सैतान असं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी थेट सदाभाऊंची लायकी काढली
"पवारांनाही मोडू शकतो, मोडणारा या महाराष्ट्राने पाहीला ; राष्ट्रवादीतील बंडावर सदाभाऊंनी केलं फडणवीसांच कौतूक

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका मोठ्या गटाला सोबत घेत बंड केल्याने राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांच्यासमोर मोठ आवाहन निर्माण झालं आहे. पवारांनी मात्र खचून न जाता नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांनी या कामाला सुरुवात केली आहे. यानंतर रयत क्रांती संघटनेते अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सदाभाऊ खोत यांना इशारा देण्यात आला आहे. मात्र, सदाभाऊ खोत यांनी आपल्या मतावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणत शरद पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचं काम त्यांनी केल्याचे म्हटलं आहे. सदाभाऊ यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना सैतान असं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि आमदार रोहीत पवार यांनी थेट सदाभाऊंची लायकी काढली. मात्र, शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.

शरद पवार यांच्याविषयी बोलातना सदाभाऊ म्हणाले की, पवारांचा मोठा दरारा होता. एवढा की अनेक मोठ्या संस्थेवर तेच प्रमुख असायचे. त्यांचा एवढा दरारा होता की, किती माणसं गायब झाली असतील याचा पत्ता नाही, असं खोत म्हणाले. यावेळी त्यांनी, माझ्याकडे लय मोठी यादी असल्याचं सांगत यांनी कशा संस्था घेतल्या, कसं कोणाला दाबल याची यादी असून योग्य वेळी बाहेर काढेन, असं ते म्हणाले.

आम्हाला अशक्य वाटलेलं देवेंद्र फडणवीस यांनी शक्य करुन दाखवलं. आमच्या सारख्या चळवळीच्या लोकांना, ज्यांनी मार खाल्ला त्यांना हे याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य मिळालं. देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत. त्यांनी प्रस्थापितांच्या वाड्याला हादरा दिला. मी म्हणत नाही की, त्यांचा वाडा पडला, पण बुरुज ढासळले आहेत. सरदार गावाकडे दडायला यायला लागले. असं सदाभाऊ यांनी सांगितलं. यावेळी पवारांना ही मोडू शकतो, मोडणारा या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. हे महाराष्ट्राने पाहीलं, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं.

logo
marathi.freepressjournal.in