समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंह यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती, अशातच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंह यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून 1977 मध्ये ते प्रथमच उत्तर प्रदेशमधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले. यासोबतच ते लोकदल, लोकदल (बी) आणि जनता दलाच्या यूपी युनिटचे प्रदेशाध्यक्षही होते. 1982 मध्ये मुलायमसिंह यादव विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर ते 1987 पर्यंत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते राहिले. 1989 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 1991 पर्यंत ते या पदावर राहिले. मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला, राज्यशास्त्रात एमए पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in