आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे अडचणीत; एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

या प्रकरणातील साक्षीदार के पी गोसावी याने आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये उकळण्याची योजना आखली असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये सांगितलं आहे.
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे अडचणीत; एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नवीन माहिती सामोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यायबाबतचे वृत्त दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार के पी गोसावी याने आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये उकळण्याची योजना आखली असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये सांगितलं आहे.

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी टाकलेल्या धाडीत ड्रग्जप्रकरणी आर्यनखान याच्यासह २० जणांना अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन खानला याप्रकरणी तब्बल महिनाभर कोठडीत ठेवलं होतं. मात्र, पुराव्याअभावी आर्यन खान याची निर्दोष सुटका झाली होती. दरम्यान, एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींच्या लाच मागितली असल्याचा आरोप केला होता. तसेच यातील ८ कोटी हे समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

साईल यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दाखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागाकडून समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच सीबीआयकडून वानखेडे यांच्याशी संबंधित मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. आता एफआरआरमध्ये सीबीआयने केलेल्या खुलाश्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in