संदीप देशपांडे यांचा राऊत बंधूंवर मोठा आरोप; म्हणाले..."

राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात यांच्याकडून हा हल्ला केल्याचा उल्लेख चार्चशीटमध्ये करण्यात आला आहे
संदीप देशपांडे यांचा राऊत बंधूंवर मोठा आरोप; म्हणाले..."

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यार मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या हल्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याप्रकरणी ३ जणांना अटक करुन त्यांची चौकशी करण्यात आली होती. निलेश पराडकर अजूनही फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात यांच्याकडून हा हल्ला केल्याचं चार्चशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. अशोक खरात यांच्यासह इतर आरोपींवर मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. निलेश पराडकर यांना गुन्हे शाखेने फरार आरोप दाखवलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास आरोपी खरात याला वाटत होता. तसंच उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यावर बक्षिस देतील असं देखील त्याला वाटलं होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी देशपांडे यांनी फरार आरोपी निलेश पराडकर ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे. त्याच्याच कार्यालयात माझ्यावर हल्ला करण्याबाबत कट रचला गेला. निलेश पराडकर कोणासोबत असायचा?, कोणासोबत फिरायचा?, त्याच्या बॅनरवर कोणाचे फोटो असायचे? तर तो राऊत बंधूंसोबत असायचा! माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे राऊत बंधूंचा हात असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे.

देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्लानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. तसंच या हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांची चौकशी करुन त्यांना कठोर शासन होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना दिलं होतं.

काय होतं प्रकरण?

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईच्या दादार येथील शिवाजी पार्कवर ३ मार्च रोजी मॉर्निंग वॉक करतेवेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. क्रिकेटच्या स्टम्प्सने हा हल्ला करण्यात आला होता. चारही हल्लेखोरांनी आपला चेहरा कापडाने झाकला होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यानंतर देशपांडे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in