Sanjay Raut : "...ते येतात, घुसतात आणि अटक करतात", ईडीच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया

२०२४ ला सर्वांचा हिशोब होईल, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला आहे.
Sanjay Raut : "...ते येतात, घुसतात आणि अटक करतात", ईडीच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया

देशातील पत्रकारांच्या घरावर झालेल्या छापेमारीवरुन तसंच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ८ ते ९ पत्रकारांवर कारवाई केली. जीनकडून फंडिंग मिळते. अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे आरोप हास्यास्पद आहेत. सरकारला प्रश्न विचारण्याचं काम हे पत्रकार बेडरपणे करतात. चीन हस्तक्षेप करत आहे. त्याबाबत सरकारला राग येत नाही. मात्र पत्रकारांवर धाडी घातल आहे, ते चुकीचं आहे. असं राऊत म्हणाले.

राऊत पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही प्रत्येक वर्षी श्राद्ध घातलात. आणीबाणीच्या काळात देखील असं झालं नव्हतं. ईडीच्या धाडी संजय सिंह यांच्यावर देखील घातल्या गेल्या. आम्ही देखील त्यांच्यातून होरपळून बाहेर पडलो आहोत. यंत्रणाच फास आवळत आहे. अटक करताना कुठलेली कारण दिले जात नाही. ईडीचे लोक अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात, घुसतात आणि अटक करतात. मात्र २०२४ ला सर्वांचा हिशोब होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

यावेळी राऊत यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, देशभरात RSS संघ परिवार सर्वोच्च न्यायालयापासून पोलीस-आर्मीपर्यंत कोणत्या पदावर कोणाला बसवेल सांगता येत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in