संजय राऊत यांची अजित पवार यांच्यावर टिका ; म्हणाले, "अजित पवार एवढे मोठे..."

संजय राऊत यांची अजित पवार यांच्यावर टिका ; म्हणाले, "अजित पवार एवढे मोठे..."

यानंतर राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आता ...

दोन दिवस आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील कोरेगाव पार्क येथे उद्योजक चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक पार पडली. यावर राजकीय वर्तुळात चांगली खळबळ उडाली. दोन्ही नेत्यांकडून ही कौटुंबीक(काका-पुतण्याची) भेट असल्याचं सांगितलं गेलं. या भेटीवर अनेकांनी उघड नराजी व्यक्त केली. यानंतर राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

राऊत म्हणाले की, अजित पवार इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवार यांना ऑफर देऊ शकतील. पवार साहेबांनी अजित पवार यांना तयार केलं आहे. अजित पवारांनी शरद पवार यांनी बनवलं नाही. शरद पवारांनी संसदीय राजकारणात ६० वर्षाहून अधिक काळ घालवला आहे. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीलेले आहेत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार त्यांच्या हयातीत भाजप सोबत हातमिळवणी करतील असं वाटत नाही. ते महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते तसंचं आमचे मार्गदर्शक आहेत. माझी त्यांच्याशी काल रात्री फोन वरुन चर्चा पार पडली. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल सोलापूरात त्यांचं उत्साहात स्वागत झालं. आज पक्षबांधणीसाठी ते संभाजीनगरला आहेत.

शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकारला पाठिंबा दिला तर त्यांना केंद्रात कृषीमंत्री किंवा निती आयोगाचे अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात, तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद देणार असल्यांच्या देखील चर्चा सुरु आहेत.

logo
marathi.freepressjournal.in