अजित पवार यांच्याविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

मी त्यावर कडक शब्दात उत्तर दिलं याचा मला खेद वाटतो आहे. असं राऊत म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्याविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं शिंदे यांनी म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधिंनी प्रश्न विचारला. राऊत यांनी असं कोण म्हणलं अस विचारल्यावर पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांच नाव सांगितलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे याचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. या घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत.

यानंतर राज्याचे विरोध पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी आपली काही संस्कृती, परंपरा असल्याचं म्हटलं होतं. आपल्याला यशवंतराव साहेबांपासून सर्वांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करु शकतो हे दाखवून दिलं असल्याचं अजित पवार म्हणाले होते. तसंच राऊत यांची दुसरी बाजू देखील ऐकायला मिळाली की त्यांना कसला तरी त्रास होतोय. परंतु, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं असं पवार 2 जून रोजी म्हणाले होते.

पत्रकारांनी संजय राऊत यांना अजित पवार यांचं विधान सांगितल्यावर राऊत यांनी "मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं", असं जोरदार प्रत्युत्तर दिलं होते. तसंच "ज्याचं जळतं त्याला कळतं" असं म्हणत आम्ही भोगत आहोत, आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. माझ्या पक्षाबरोबर मी ठाणपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटे येतात म्हणून भाजप बरोबर सुत जुळवण्याचा विचारही येत नाही, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

यावर संजय राऊत यांनी स्पष्टकरण दिलं आहे. अजित पवार आणि माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे. त्यामुळे आम्ही बोलून जातो. महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे हे अजित पवार यांचं म्हणणं योग्य आहे. मी सहमत आहे. थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला असही अजित पवार म्हणाले. मला मात्र वेगळा प्रश्न विचारण्यात आला. मी त्यावर कडक शब्दात उत्तर दिलं याचा मला खेद वाटतो आहे. असं राऊत म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in