"पंतप्रधानांनी नंतर भूमिका बदलली, मात्र आमची भूमिका आधिपासून तिच", इस्रायल बाबतच्या पोस्टवर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

इस्त्रायच्या दुतावासाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पोस्ट लिहून निषेध व्यक्त केला आहे.
"पंतप्रधानांनी नंतर भूमिका बदलली, मात्र आमची भूमिका आधिपासून तिच", इस्रायल बाबतच्या पोस्टवर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ५० दिवसांपासून युद्ध सुरु आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. यामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमुळे इस्रायलने देखील संताप व्यक्त केला आहे. इस्त्रायच्या दुतावासाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पोस्ट लिहून निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर पोस्ट केली होती. यावर कमेंट करताना त्यांनी "हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होता, हे आता समजतंय का?" असा प्रश्न उपस्थित करत होता. राऊत यांनी केलेल्या या पोस्टवर मोठ गदारोळ उठला. यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहित राऊत यांचा निषेध नोंदवला आहे. संजय राऊत यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

गाझा पट्टीत लहान मुलं, मुली त्यांच्या माता, आजी असे सगळे निरपराध लोक मारले जात आहेत. त्यांना मदत मिळायला हवी. त्यांनी मारु नये हिच आपली मानवता आहे. युद्धाचे नियम पाळले जायला हवे. याबद्दल मी माझी टिप्पणी केली आहे. त्यांने कोणाच्या दुखावल्या असतील तर त्याला मी काय करु शकतो. जगभरात ज्चू राहतात. भारतातही आहेत. भारतात आपण त्यांना वर्षानुवर्षे प्रेम दिलं, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंपासून जी भारताची भूमिका राहिली आहे. तीच आमची आणि देशाची भूमिका आहे. युद्ध सुरु झालं तेव्हा आपले पंतप्रधान इस्रायल बरोबर उभे राहिले. नंतर त्यांनी भूमिका बदलली. आता त्यांची वेगळी भूमिका आहे. परंतु, आम्ही कधी आमची भूमिका बदलली नाही. पंडित नेहरु इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आपल्या देशाची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in