सत्येंद्र जैन यांचा जामीन मंजूर; तब्बल वर्षभरानंतर येणार तुरुंगाबाहेर

सत्येंद्र जैन यांचा जामीन मंजूर; तब्बल वर्षभरानंतर येणार तुरुंगाबाहेर

न्यायालयाने जैन यांना वैद्यकीय अहवालाच्या आधारे 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रिम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. जैन यांचा अंतरिम जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. न्यायालयाने जैन यांना वैद्यकीय अहवालाच्या आधारे 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. 30 मे 2022 रोजी सत्येंद्र जैन यांनी ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता तब्बल 360 दिवसांनी त्यांचा जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे. गुरुवारी तिहाड कारागृहातील बाथरुमध्ये ते पडले होते. त्यानंतर जैन यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जैन यांना डीडीयू रुग्णालयात ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीविषय बातमी समजल्यावर त्यांनी ट्विट केले. जनतेला चांगले उपचार मिळावे म्हणून झटणाऱ्या व्यक्तीला आज हुकुमशहाने त्रास दिला आहे. प्रत्येकाला संपवायचे हा त्या हुकुमशहाचा एकच विचार असतो. तो फक्त 'मी' मध्ये राहतो. त्याला फक्त स्व:ताला बघायचे आहे. देव सर्व पाहत असून तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यात ईश्वर बळ देवो, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून जैन हे तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायाकडून नुकताच त्यांना जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत जैन यांच्या वकिलांनी त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in