काल अजित पवार, शरद पवार गुप्त भेट ; आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, चर्चांना उधान

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
काल अजित पवार, शरद पवार गुप्त भेट ; आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, चर्चांना उधान

शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याती गुप्त बैठक पार पडल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपतीच्या घरी या दोघांची भेट झाली असून या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यत्र जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. यानंतर आज(१३ ऑगस्ट) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. याआधी हो दोन्ही नेते पुण्यातील कार्यक्रमात येकत्र आले होते.

भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथे पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आज एकाच मंचावर येणार आहेत. शरद पवार यांचे सकाळी १०.४० वातजा सोलापूर विमानतळावर आगमन केल्यानंतर ते आयटीपार्कचं भूमिपूजन करतील. यानंतर दुपारी २.४५ वाजता ते सांगोला येथे जाणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान ते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारक अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत. यानंतर शरद पवार हे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर पवार हे सायंकाळी ६.४५ वाजता बारामतीकडे प्रयाण करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचं आज दुपारी १२.४० वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. यानतर दुपारी १२.४५ वाजता ते न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कालेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोलासाठी रवाना होणार आहेत. यानंतर ते दुपारी अडीच वाजता स्व. डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण महाविद्यालय नामांतर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.सासंकाळी ४ वाजता फडणवीस सोलापूर विमानतळाकडे कुच करणार असून यानंतर ते संध्याकाळी ५.३५ वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत.

काल शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची गुप्त भेट आणि आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in