शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी 'इंडिया' आघाडीची साथ सोडली पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी 'इंडिया' आघाडीची साथ सोडली पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

सनातन धर्माचं मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झालं पाहिजे. असं विधान तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात गदारोळ माजला होता. यावरुन आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिलं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य नसेल तर त्यांनी 'इंडिया' आघाडीची साथ सोडली पाहिजे, असं चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, इंडिया आघाडीत असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म संपत नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. असं विधान केलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हे विधान स्वीकारलं आहे.

पण 'इंडिया' आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी 'इंडिया' आघाडीची साथ सोडली पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी हिंदूस्तानातील हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत, असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in