Anil Deshmukh: अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार गटाचं प्रत्युत्तर; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला मोठा गौप्यस्फोट

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली
Anil Deshmukh: अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार गटाचं प्रत्युत्तर; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) अजित पवार(Ajit Pawar) गटाने भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर शरद पवार(Sharad Pawar) गटावर आरोप केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बँटिंगला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी अजित पवार गटावर जोरदार पलटवार केला आहे. मी भाजपसोबत जाव यासाठी हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) माझ्याघरी पाच तास बसून होते, असं गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार गटाने केलेले आरोप शरद पवार गटाने धुडकावून लावत काही गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्या भारतीय जनता पक्षाने मला खोट्या प्रकरणात फसवलं, त्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्यासोबत जाण्यासाठी हवं ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. ज्यांनी मला फसवलं त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. मी भाजप सोबत याव यासाठी हसन मुश्रीफ पाच तास माझ्या घरी बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. मात्र मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं अजित पवार यांना सांगितलं असल्याचं देशमुख म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in