Gujrat Election Results : गुजरातच्या निकालानंतर शरद पवारांनी केले 'हे' वक्तव्य

दिल्लीबरोबरच पंजाब आणि आता हिमाचलमध्येही हळुहळू आता बदल होत आहेत. दिल्लीमध्ये आप सरकारने मोठ्या प्रमाणावर पोकळी भरून काढली आहे
File
File

गुजरातमधील निवडणुकांचे (Gujrat Election Results 2022) निकाल हे एकतर्फीच लागतील असे चित्र पहिल्यापासूनच स्पष्ट होते. मात्र याबाबतीत सर्व पक्षांमधून, माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या. या निकालाच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईमध्ये बोलताना सांगितले की, एका राज्याच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेतले गेले. त्या राज्यात किती प्रकल्प होतील याची काळजी घेण्यात आली, सर्वांनाच माहीत होते की याचा परिणाम होतो.

शरद पवार म्हणाले, "देशात वेगळे वातावरण आहे. नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकांनी वेगळी दिशा दाखवायला सुरुवात केली आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती.

देशात बदल हळूहळू होत आहे

गुजरातच्या निकालाचा अर्थ असा नाही की देशात एकीकडे मतप्रवाह वाहत आहेत. हिमाचलमध्ये जिथे भाजपची सत्ता होती तिथे आता काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या आहेत. दिल्लीबरोबरच पंजाब आणि आता हिमाचलमध्येही हळुहळू आता बदल होत आहेत. दिल्लीमध्ये आप सरकारने मोठ्या प्रमाणावर पोकळी भरून काढली आहे.

निवडणुका पुढे ढकलल्यानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी पुढाकार घेतला, इथेही आम्ही पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही पोकळी भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण आपले काम चालू ठेवले पाहिजे. या निवडणुकांमध्ये नवीन पिढी आणा. शरद पवार म्हणाले की, शक्य असेल तर त्या ठिकाणच्या तरुण कार्यकर्त्याला डावलायचे नाही तर त्यांना संधी द्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in