शरद पवारांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा ; म्हणाले, "सत्तेच्या बाजूने जायचं जा पण..."

आज शरद पवार यांच्या सभेचं बीड येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना चांगचलं फटकारलं
शरद पवारांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा ; म्हणाले, "सत्तेच्या बाजूने जायचं जा पण..."
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात झालेल्या बंडानंतर पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. आज पवार यांच्या सभेचं बीड येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शरद पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंना चांगचलं फटकारलं. सत्तेच्या बाजूने जायचं असेल तर जा. पण निदान ज्यांच्याकडून काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी ठेवायचा प्रयत्न करा. असं पवार म्हणाले.

बीड येथील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. कालपर्यंत ठीक होता. कुणीतरी सांगितलं पवारसाहेबांचं वय झालंय. भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहीजे. तुम्ही माझं वय झालंय बोलता पण तुम्ही माझ काय बघितलंय? तुम्हाला सामुहित शक्ती उभी केल्यावर काय होतं हे पाहायचंय, तरुण पिढीच्या मदतीने अनेकांचे पराभव झालेत. सत्तेच्या बाजूला जायचं तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा. नाही केला तर लोकं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी या सभेत केला.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला जुन्या काळाची आठवण झाली. लोकांच्यामध्ये राहणारे नेतृत्व, जी निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नाही, बीडची जनता त्यांच्या पाठीशी भक्कम शक्ती उभी करते. संदीपने ते दाखवलं असं सांगितलं

केशरकाकूंचा सांगितला किस्सा

निष्ठेचा मुद्दा उपस्थित करताना पवार यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आजी केशरकाकू क्षीरसागर यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "अनेक वर्षापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. महाराष्ट्र नेतृत्व तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होतं. आम्ही सगळे त्यांच्या विचारधारेने काम करत होतो. त्यावेळी खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका काहींनी मांडली. सामान्य लोक अस्वस्थ होते. या जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळी केशरकाकू यांच्याकडे होतं. त्यावेळी काकूंनी निष्ठेशी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी माघार घेणार नाही. अस त्या म्हणाल्या. आज तीच स्थिती त्यांच्या नातूने केली याचा मला अभिमान आहे, असं त्यांनी सांगितलं."

सद्यास्थितीवर बोलताना पवार म्हणाले की, देशाचं चित्र वेगळं आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. राजधर्म, भाषा यातून समाजात अंतर कंस वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेल, बियाणे-खते यांच्या किंमती वाढल्या आहेत. न परवडणारी शेती अशी अवस्था झाली आहे. असं पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in