सोलापुरकरांच्या प्रेमाने शरद पवार भारावले ; 4 जेसीबींच्या सहाय्याने वाहनावर पुष्पवृष्टी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे काही आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापूरात आले होते
सोलापुरकरांच्या प्रेमाने शरद पवार भारावले ; 4 जेसीबींच्या सहाय्याने वाहनावर पुष्पवृष्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं रविवारी सोलापुरात आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्या ताफ्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्ठी देखील करण्यात आली. सोलापुरात नवीन आयडी हब प्रकल्पाचं भुमिपूजन आणि सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पुर्माकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार हे सोलापुरात दाखल झाले होते. यावेळी विमानतळ रस्त्यापासून ते डोणगाव रस्त्यावरील नवीन आयटी हब प्रकल्प भूमिपूजन स्थळापर्यंत आणि त्यानंतर मरिआई चौक, मंगळवेढामार्गे सांगोल्यात पोहचेपर्यंत त्यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं

यावेळी शरद पवार यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. महत्वाचं म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे काही आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापूरात आले होते. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडले त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं. यावेळी पवारांनी देखील आपल्या वाहनातून खाली उतरुन कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. यावेळी कार्यकर्त्यांनीकडून मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या.

पवार हे डोणगाव रस्त्यावरील नवीन आयटी हबच्या भूमिपूजनाला जात असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी चार जेसीबींच्या सहाय्याने पवार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. काही ठिकाणी तर गोंगडी देऊन त्यांचं स्वागत केलं गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी पवारांनी देखील कार्यकर्त्यांच्या गर्दीत सामील होऊन त्यांचा उत्साह वाढवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in