शरद पवार गटाचं ठरलं! लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढणार लढणार असल्याची जयंत पाटील यांची माहिती

यावेळी पाटील यांनी अजित पवार गटाशी दोन हात करण्यासाठी तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.
शरद पवार गटाचं ठरलं! लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढणार लढणार असल्याची जयंत पाटील यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये १४ ते १५ जागा आपण लढविणार असून काही ठिकाणचे अमेदवार बदलले जातील. आपली तयारी पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. तसंच यावेळी अजित पवार गटाशी दोन हात करण्यासाठी तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.

महाविकास आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावसुन चर्चा सुरु आहे. काही जागांवर तिढा असला तरी तो सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे. असंही ते म्हणाले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती, शिरुर रायगड, सातारा या लोकसभा मतदार संघात उमेदवार उभं करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

जयंत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होणार आहे. आपण १४ ते १५ जागा आपण लढविणार आहोत. त्यामध्ये अमरावती, भंडारा बारामती, सातारा, शिरुर, रायगड, रावेर, दिंडोरी या मतदार संघांचा समावेश आहे. काही मतदार संघात आपण उमेदवार बदलणार आहोत, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांचा पक्ष वेगळा झालेला आहे. काही जागा त्यांना लढाव्या लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण खरंच लढवणार की लढवल्यासारख दाखवणार हे बघायचं आहे, असा टोला पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अजित पवारांना मारला. शरद पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन आंदोलन असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हता. शरद पवारांनी गाफील ठेवल याबाबत मी आता बोलणार नाही, नंतर निवांत बोलेण, असं देखील पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in