भाजप- शिंदे गटात बिनसलं! खासदाराचा गंभीर आरोप

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत खंत व्यक्त केली आहे
भाजप- शिंदे गटात बिनसलं! खासदाराचा गंभीर आरोप

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांनी एकत्रित येत राज्यात सत्ता स्थापन केली. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे दोन्ही पक्षांकडून वारंवार सांगितले जात आहेत. मात्र, दोन्ही गटात सर्व सुरळीत नसल्याचे उघड झाले आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत खंत व्यक्त केली आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. कीर्तीकर यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत बोलताना कीर्तीकर म्हणाले की, "आम्ही सर्व 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. याम्ही यापुर्वी एनडीएचे घटक नव्हतो, आता आहोत. त्यामुळे आमची कामे त्या पद्धतीने झाली पाहिजे. घटक पक्षांना देखील महत्व दिले गेले पाहिजे. पण ते दिले जात नसल्याचे आमचे म्हणणे आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे." असा आरोप शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

शिवसेना (शिंदे गट) 22 जागा लढवणार

गजानन कीर्तिकर यांना शिंदे गटाने 22 जागा जागांवर दावा सांगितलाय का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी दावा कशाला केला पाहिजे? 2019 च्या निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो, त्यावेळी भाजपने 26 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांच्या 23 जागांवर विजय झाला होता. तर 3 उमेदवारांचा पराभव झाला होता. शिवसेनेने त्यावेळी 22 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 18 खासदार निवडून आले होते. तर 4 उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे आम्ही 22 जागा लढवणार आहोत. असे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणजे मनोरंजनाचे साधन

यावेळी बोलताना कीर्तिकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. राऊत म्हणजे घरात बसल्या मनोरंजनाचे साधन आहेत. ते मनोरंजन करतात. आम्ही त्यांना गांभिर्याने घेत नाही. त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थ नाही. ते फक्त कोट्या करतात, असे कीर्तिकर म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in